वृत्तसंस्था/. बर्नेली
प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीने विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेतील शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने बर्नेलीचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात मँचेस्टर सिटीच्या हेलँडने पूर्वार्धात दोन गोल केले. त्याने चौथ्या आणि 36 व्या मिनिटाला हे गोल नोंदविले. नॉर्वेच्या हेलँडने विविध लीग फुटबॉल स्पर्धांमध्ये आतापर्यंत 52 गोल नोंदविले असून त्याचे मँचेस्टर सिटीकडून खेळण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. मँचेस्टर सिटीचा आणखी एक गोल रॉड्रीने नोंदविला. आता मँचेस्टर सिटीचा येत्या बुधवारी युफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामना सेव्हीला क्लबबरोबर होणार आहे.