आचरा प्रतिनिधी
आचरा परिसरात गेले तीन दिवस धो -धो पाऊस पडत असून आचरे गावात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा सोसाट्याचा वारा सुटला होता. आचरा- काझीवाडा येथील फातिमा जुबेर काझी यांच्या राहत्या घराच्या पडवीवर आंब्याचे झाड पडून सुमारे तेवीस हजारा नऊशे रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुरुवारी सायंकाळी उशिरा आचरा काझीवाडा येथील फातिमा जुबेर काझी यांच्या राहत्या घराच्या पडवीवर आंब्यांचे मोठे झाड पडून नुकसान झाले आहे. या बाबत आचरा तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी यांनी शुक्रवारी सकाळी जाऊन पंचनामा केला. यात काझी यांच्या घराचे सुमारे तेवीस हजाराचे नऊशे रुपयांचे नुकसान झाले आहे.