आमदार डॉ देविया राणे : वाळपई, पर्ये मतदारसंघाच्या सर्व बूथवर नागरिकांचा चांगला प्रतिसाद
वाळपई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या शंभरव्या संवाद कार्यक्रमात सत्तरी तालुक्मयातील सर्व मतदान केंद्रावर चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभला. सर्व मतदान केंद्रावर यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. पर्ये मतदारसंघाचे आमदार डॉ. देविया राणे यांनी ठाणे येथील बूथवर आपली हजेरी लावून या संवाद कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. वाळपई मतदारसंघातील 50 तर पर्ये मतदारसंघातील 56 बूथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभरव्या ‘मन की बात’ ऐकण्यासाठी भाजपाने पर्ये मतदारसंघातील व वाळपई मतदारसंघातील सर्व बूथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्ये मतदारसंघातील ठाणे येथील कार्यक्रमांमध्ये आमदार डॉ. देविया राणे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी संपूर्ण संवादाचा कार्यक्रम त्यांनी संपूर्णपणे पाहिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार डॉ देविया यांनी सांगितले की नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मन की बात हा विशेष उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमाचा 100 वा संवादाचा कार्यक्रम होता. यामध्ये त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कौशल्य पणाला लावून भारतीय नागरिक करीत असलेला उपक्रम यावर विशेष भर देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील तऊणांमध्ये व कलाकारांमध्ये असलेले कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होत असते. त्याचप्रमाणे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना प्राप्त होत असते, असे यावेळी त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येण्याची चांगली संधी उपलब्ध असते. या संधीच्या माध्यमातून विकासाला चालना प्राप्त होत असते. समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघ होऊन देशाच्या विकास प्रक्रियेला सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असते असे यावेळी त्यांनी सांगितले व नरेंद्र मोदी यांच्या संवादाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा कामाला चालना मिळणार असल्याची आशा व्यक्त केली. दरम्यान वाळपई मतदारसंघातील अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन नगरगाव पंचायत क्षेत्रातील साटे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. साटे पंच सभास लक्ष्मण गावस यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये वाळपई मतदार संघ भाजपाचे संघटक विनोद शिंदे सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती .