Jalna Lathi Charge Kolhapur News : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या भीषण लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. कोल्हापुरातील दसरा चौक येथे मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज आंदोलनासाठी जमले होते. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत लाठीचार्जचे उत्तर मागण्यात आले. यावेळी आंदोलनातील महिलांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
‘जवाब दो, जवाब दो महाराष्ट्र सरकार जवाब दो’, ‘एक मराठा, लाख मराठा’,मराठ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचे करायचे काय ,खाली डोके वर पाय, जनरल डायर कोण रे पायताण मारा दोनरे ‘ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसतंराव मुळीक,संदीप देसाई, संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले आदिल फरास गणी आजरेकर,दिलीप देसाई, बाबा शारंगधर देशमुख,आर.डी पाटील, शाहीर दिलीप सावंत, सुनिल मोदी, किशोर घाटगे ,हर्षल सुर्वे, बबा इंदूलकर, दुर्वास कदम, शाशिकांत पाटील,मधुकर रामाणे, गिरीष फोंडे, अॅड प्रकाश मोरे, जय कुमार शिंदे, शैलजा सूर्यवंशी, हेमा देसाई, अनुपमा चव्हाण, संगीता कदम, रंजना पाटीलसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.