वार्ताहर,सोनी
Maratha Reservation Jalna Protest : जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या भीषण लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सोनी (ता. मिरज) येथे गुरुवारी कडकडीत बंद पाळला.या बंदला व्यापाऱ्यासह ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.
सकाळी ८ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण गावातून मोर्चा काढण्यात आला.यामध्ये बहुसंख्य मराठा तरुण सहभागी झाले.नेहमी गजबलेला बसस्थानक,जगदंब चौक,बाजारपेठ परिसर याठिकाणी या बंदमुळे शुकशुकाट होता.गावातीत सर्व समाजाचा या बंदला मोठा पाठिंबा होता.मोर्चात ग्राम पंचायत सदस्य अरविंद पाटील,गजानन पाटील,माजी सोसायटी चेअरमन जयसिंग यादव, जयसिंग चव्हाण,राहुल पाटील, प्रताप पाटील ,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील व मराठा समाजातील सर्व तरुण सहभागी होते.
सोनी तसेच संपूर्ण जिल्हा बंद पुकारला असल्यामुळे मिरजवरून मणेराजुरी एसटी सेवा बंद करण्यात आली. एसटी सेवा विस्कळित झाल्यामुळे पाटगाव, सोनी,करोली व मणेराजुरी येथील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रवासी यांना त्रास सहन करावा लागला.
बंद मधून दवाखाने,मेडिकल,बँक,पोस्ट ऑफीस, शाळा व अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.