वृत्तसंस्था/ मँचेस्टर
अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 54 षटकांत 5 बाद 216 धावा जमविल्या होत्या. मार्नस लाबुशेनने अर्धशतक नोंदवले. ब्रॉडने 600 कसोटी बळींचा टप्पाही गाठला.
या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर असून इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने उस्मान ख्वाजाला (3) लवकर बाद करण्यात यश मिळविले. पण वॉर्नर व लाबुशेन यांनी 46 धावांची भर घातल्यानंतर वॉर्नर 32 धावा काढून बाद झाला. लाबुशेनला स्मिथकडून चांगली साथ मिळाली. दोघांनी मिळून 59 धावांची अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर स्मिथ 41 धावांवर बाद झाला. त्याने 52 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार मारला. आणखी 63 धावांची भर पडल्यानंतर लाबुशेन वैयक्तिक अर्धशतक पूर्ण झाल्यावर बाद झाला. त्याने 115 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा जमविल्या. हेड 65 चेंडूत 7 चौकारांसह 48 धावा काढून बाद झाला तर मार्श 20 व ग्रीन 9 धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या ब्रॉडने 2 तर वोक्स, वूड, मोईन अली यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक (54 षटकाअखेर) : ऑस्ट्रेलिया प.डाव 5 बाद 216 : लाबुशेन 51, हेड 48, स्मिथ 41, वॉर्नर 32, ब्रॉड 2-62.