साधारण 1 टक्का वाढल्या किमती ः अंतर्गत खर्चात वाढीचे कारण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील दिग्गज कारनिर्माती कंपनी मारुती सुझुकीने आपल्या विविध कार्सच्या किमती सोमवारपासून वाढवल्या असल्याची माहिती आहे. सदरच्या कार्सच्या किंमतीत अंदाजे 1.1 टक्का इतकी वाढ मॉडेलनुसार झाली आहे.
16 जानेवारीपासून कंपनीने कार्सच्या एक्सशोरुम किमतीत 1.1 टक्के वाढ केली आहे. विविध मॉडेलनुसार किमतीत कमी अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. अंतर्गत खर्चात झालेल्या वाढीमुळे कार्सच्या किमती वाढवाव्या लागल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. दिल्लीतील ऑल्टोच्या बेस मॉडेलची एक्सशोरुम किंमत नव्या दरानुसार 3 हजार 729 रुपयांनी वाढणार आहे तर दुसरीकडे इर्टिगाची किंमत ही 9 हजार 251 रुपयांनी वाढली असल्याचे सांगितले जाते.
जिम्नीला मिळतोय प्रतिसाद
याचदरम्यान अलीकडेच ऑटो एक्स्पोत सादर केलेल्या कंपनीच्या जिम्नी या नव्या कारला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय. लाँच होण्याच्या 2 दिवसातच 3 हजार जणांनी गाडी बुक केली आहे.
1.16 लाख कार्सची विक्री
दरम्यान कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये एकंदर 1.16 लाख कार्सची विक्री केली आहे. याआधी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 1 लाख 59 हजार 044 कार्सची विक्री केली होती, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.