ग्रँड विटारामध्ये जबरदस्त फिचर्स
प्रतिनिधी /मडगाव
मोठय़ा प्रतीक्षेनंतर मारुती सुझुकी कंपनीने त्यांची मिड साईज एसयूव्ही मारुती सुझुकी ‘ग्रंड विटारा’ काल सोमवार दि. 12 रोजी गोव्याच्या बाजारपेठेत आणली. मारुती सुझुकी कंपनीची ही पहिलीच एसयूव्ही कार आहे. देशभरात सुमारे 40 हजार लोकांनी या कारचे बुकिंग केलेय तर गोव्यात चौगुले कंपनीच्या फातोर्डा-मडगाव येथील नेक्सा शोरूमध्ये काल पर्यंत 100 कार बुकिंगची नोंद झाली होती.
नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास तुयेकर यांच्या हस्ते ग्रँड विटाराचे गोव्यात अनावरण करण्यात आले. यावेळी चौगुले इंडस्ट्रीज प्रा. लि.चे चेअरमन विजय चौगुले, चौगुले इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा चौगुले, चौगुले इंडस्ट्रीजच्या सीईओ तेजश्री पै, मारिओला फर्नांडिस आणि सावियो आरावजो उपस्थित होते.
ग्रंड विटारा कार बाजारात ह्युंदाई पेटा, किआ सेल्टॉस, फोक्सवॅगन टायगुन आणि स्कोडा कुशाक सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करणार आहे. परंतु एक गोष्ट अशी आहे जी या कारला तिच्या स्पर्धकांपेक्षा वेगळं बनवते, ते म्हणजे या कारचं मायलेज या कारमंध्ये कंपनीने माईल्ड हायब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड असे दोन पॉवरटेन पर्याय दिले आहेत. ज्यामुळे ही कार मजबूत मायलेज देते. ही भारतीय बाजारातली सध्याची सर्वाधिक मायलेज देणारी एसयूव्ही कार ठरणार आहे.
ही कार भारतात दोन पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1.5 इंटेलिजेंट इलेक्ट्रकि हायब्रिड (Intelligent Electric Hybrid) आणि 1.5 K-Series Mild Hybrid (सीरीज माइल्ड हायब्रिड) या इंजिनांचा समावेश आहे. या इंजिनांच्या जोरावर ही कार जबरदस्त मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मारुती ग्रँड विटारा ही कंपनीची पॅनोरमिक सनरूफसह येणारी कार आहे. यात हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसारखे फीचर्स देखील मिळतात. या कारमध्ये एम्बSिंट लायटिंग, प्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री, रिअर एसी व्हेंट्स, इंजिन सुरू आणि बंद करण्यासाठी पुश बटण, यूएसबी पोर्टसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
अवघ्या 11 हजारांत ग्रँड विटारा ही कार बुक करण्याची संधी ग्राहकांना देण्यात आली आहे. या कारचे आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे एक लिटर पेट्रोलवर 28 किलो मीटरचे अंतर पार करणे शक्य होणार आहे.