वार्ताहर/ म्हसवड
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रंथ व ग्रंथकार पुरस्कार सोहळ्यात कविता म्हेत्रे यांच्या ‘अस्वस्थ दिवसांची सुगी’ ह्या काव्यसंग्रहाला जेष्ठ हिंदी लेखिका सुर्यबाला यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कै. फुलाबाई आनंदराव फडतरे स्मृती पुरस्कार देण्यात प्रदान करण्यात आला. एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे झालेल्या मसापच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते.
लोकवाङमय गृहने प्रकाशित केलेला कविता म्हेत्रे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. आत्मभानाच्या वाटेवर चालणारी त्यांची कविता स्त्राrकेंद्री जाणिवा व्यक्त करणारी आहे. इथल्या समाज व्यवस्थेला जाब विचारणारी विद्रोही आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे.गेली 116 वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. मसापच्या ह्या सोहळ्यातील पुरस्कार बहात्तर परीक्षकांनी परीक्षण करून देण्यात आले आहेत.
यावेळी कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीतराजे पवार प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, महाराष्ट्र साहित्य पत्रिका संपादक डॉ. पुरुषोत्तम काळे, महाराष्ट्रातून आलेले मान्यवर लेखक, वाचक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.