माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची घेतली भेट
मालवण / प्रतिनिधी
मालवण शहर व तालुक्यातील दलित वस्ती असलेल्या भागात शासनाच्या अपुऱ्या सुविधा सदर वस्त्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांबाबत प्रशासकीय अधिकारी यांची कार्यवाही बाबतची असलेली उदासीनता जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाडगावकर यांनी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. व काही मुद्दे मांडले .
यावेळी ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या ठिकाणी बैठका घेऊन त्याबाबत पालिका प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार करा मी त्याबाबत संबंधित अधिकारी यांशी बोलून घेईन. गावागावात तळागाळात जाऊन तिथल्या समस्यांवर काम करा तुमच्या सारख्या युवकांच्या हाती या देशाचे भविष्य आहे
राहुल जी देखील जनतेत जाऊन आज देशात जागोजागी युवा नेतृत्व निर्माण करत आहेत तुम्ही काम करत रहा मी तुमच्या सोबत आहे असं डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस निलेश जोशी, अरविंद मोंडकर, सचिव बाब्या म्हापसेकर, विभावरी सुखी, अमिदि मेस्त्री व इतर पदाधिकारी उपस्थित होते