बेंगळूर
आरामदायी लक्झरी गटात कार्स सादर करणाऱ्या मर्सिडीझ बेंझने 2023 च्या पहिल्या सहामाहीत विक्रमी कार विक्री केल्याची माहिती आहे. जानेवारी ते जून या पहिल्या 6 महिन्यात कंपनीने 8 हजार 528 कार्सची देशभरात विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 7573 कार्स विक्री केल्या होत्या. मागच्या तुलनेत विक्री 13 टक्के वाढली आहे. एप्रिल ते जूनमध्ये 3831 कार्स विकल्या गेल्या आहेत. या आधीच्या वर्षी याच अवधीत 3551 कार्सची विक्री झाली होती.