ऑनलाईन टीम/तरुण भारत
Sangli Mass Murder : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ हत्याकांडानं राज्याला हादरवून सोडलं. गुप्तधनाच्या आमिषा पोटी हे हत्याकांड झाल्याचे पोलिस तपासात उघड झालयं. या हत्याकांडातील संशयित मांत्रिकाला आज अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशियित आरोपीचे नावं आब्बास बागवान आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांची हत्या केल्याचा आरोप या मांत्रिकावर आहे. त्याने काळ्या चहातून या कुटुंबाला विष देऊन हत्या केली. त्याला 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Sangli Mass Murder)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
म्हैसाळ गावातील पोपट वनमोरे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून मंत्रिकाच्या संपर्कात होते. या मांत्रिकाने 19 जून या दिवशी गुप्त धन मिळणार आहे अशी खात्री या कुटुंबाला दिली होती. त्यानुसार मंत्रिकाने 19 जून या दिवशी 9 जणांना वेगवेगळ्या खोलीत थांबण्यास सांगितले. त्यानंतर त्याने घरातील लाईट बंद करण्यास सांगितली. लाईट बंद केल्यानंतर त्याने सर्वांना काळ्या चहातून विष देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात समोर आलं आहे. आरोपी रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत म्हैसाळमधील वनमोरे कुटूंबाच्या घरी होता. हे सगळे मयत झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपींनी पहाटे 5 वाजता म्हैसाळमधून पळ काढत सोलापूर गाठले. अखेर आज पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.