वारणानगर, प्रतिनिधी
वसंत सागर या चांदोली धरण व वारणा परिसरात बुधवार दि.१६ रोजी सकाळी ६.३५ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जानवला या भूकंपाची तीव्रता ३.२ रिस्टर स्केल एवढी होती वारणावती पासून धरण क्षेत्रासह केंद्र बिंदू पासून १५. २ कि.मी. परिसरात हा भूकंप जानवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
वारणावती भूकंप केंद्रावर झालेल्या नोंदी नुसार ७.५ सेंकद पर्यन्त भूकंप झाला असून कोणतेही नुकसान झालेले नाही नागरिकांनी भयभीत न होता सावधानता बाळगावी असे वारणा पाटबंधारे कोडोली उप विभागाचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यानी सांगीतले.
चांदोली धरण क्षेत्रात पाऊसाचा जोर पूर्णता ओसरला आहे दैनदिन ३ ते १० मि.मी. सद्या पाऊस पडत आहे आजवर धरण क्षेत्रात १३८२ मि. मी. पाऊस पडला असून धरणात २९.४९ टीएमसी पाणीसाठा होऊन धरण ८५.७१ टक्के भरले असून विद्युत निर्मीती साठी १५९७ क्यूसेस विसर्ग वारणा नदी पात्रात सुरु असल्याचे सहा. अभियंत श्री. किटवाडकर यानी सांगीतले.