स्मरणशक्ती कमकुव होण्याचा वेग मंदावतो
आहार शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही मोठा प्रभाव पाडत असतो. एका विशेष आहाराचे सेवन मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास सहाय्यभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 5.5 कोटी लोक डिमेंशियाने पीडित असून यातील 40 टक्के प्रकरणांना व्यायाम, झोप आणि उत्तम आहाराने रोखले जाऊ शकत होते.
डिमेंशियापासून वाचण्यासाठी ‘माइंड डायट’ला सर्वात उपयुक्त मानले जात आहे. माइंड डायटचे पालन करणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा वेग मंद असतो. डिमेंशियाची जोखीम अशा लोकांना कमी असते. माइंड डायटचा सर्वात पहिला उल्लेख रश युनिव्हर्सिटीच्या पोषण तज्ञ मार्था क्लेयर मॉरिस यांनी केला होता. जे लोक डीएएसएच आणि मेडिटेरियन आहाराचे पालन करतात आणि फळे, भाज्या, भरडधान्य, प्रथिनयुक्त आहार घेतात, त्यांच्यात डिमेंशियाची लक्षणे दिसून येत नसल्याचे म्हटले गेले आहे.
प्रोबायोटिक्स वय वाढण्यासोबत स्मरणशक्ती आणि विचारशक्ती कमजोर होण्यापासून रोखू शकते. यामुळे अल्झायमर आणि डिमेंशिया यासारख्या आजारांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. चांगल्या बॅक्टेरियाला प्रोबायोटिक्स म्हटले जाते. काही बॅक्टेरिया शरीरासाठी लाभदायक असतात, तर काही बॅक्टेरिया शरीरासाठी हानीकारक असता. दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया रेस्पिरेटरी (श्वासनलिका) आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ‘चेक अँड बॅलेन्स’चे काम करतात. जर तुम्ही एखाद्या आजारामुळे अँटीबायोटिक गोळ्यांचे अधिक सेवन केल्यास याचे नुकसान कमी करण्यासाठी प्रोबायोक्टिस उपयुक्त ठरतात. या प्रोबायोटिक्सना फूड आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सद्वारे मिळविले जाऊ शकते.
प्रोबायोटिक फूडचे लाभ
प्रोबायोटिक फूड सप्लिमेंट्स पोटात चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवितात. यामुळे अन्न पचन होण्याची प्रक्रिया सुधारते. रेसिस्टेंट स्टार्ट तुटल्याने ब्यूटायरेट नावाचे कंपाउंड तयार होते, ते मेटाबॉलिज्म सुधारण्यास मदत करते. यामुळे वजनाचे योग्य व्यवस्थापन होते. ब्यूटायरेट स्थुलत्व दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रोबायोटिक फूड रोगप्रतिकारकशक्तीला चालना देण्यास मदत करते. चांगल्या बॅक्टेरियांच्या अभावामुळे महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन प्रभावित होतो. एस्ट्रोजनच्या असंतुलनामुळे अनेक आजार होत असतात. प्रोबायोटिक फूड्स महिलांच्या हार्मोन्सना संतुलित करतात. प्रोबायोटिक फूड ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतात.