आर्मी दिनाचे औचित्य : विजेत्यांना बक्षीस वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे 75 व्या आर्मी दिनाचे औचित्य साधून रविवारी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिला, माजी सैनिक तसेच सामान्य नागरिक सहभागी झाले होते. भारतीय लष्कराचे देशाच्या संरक्षणात महत्त्वाचे स्थान आहे, हे स्पष्ट करण्यासाठी मॅरेथॉन घेण्यात आली.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे उपकमांडंट कर्नल स्वप्निल व्ही. टी. यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचे उद्घाटन झाले. यामध्ये 112 महिला, 53 माजी सैनिक व 24 सामान्य नागरिक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. 5 कि. मी. अंतरामध्ये ही मॅरेथॉन घेण्यात आली.
यावेळी बोलताना उपकमांडंट स्वप्निल व्ही. टी. म्हणाले, नागरिकांमध्ये देशभक्ती तसेच सैन्याबद्दल आपुलकी वाढविण्यासाठी ही मॅरेथॉन घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.