बंगालमधील भाजप आमदाराचे कृत्य
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदार स्वप्न मजूमदार यांनी बनगाव या स्वतःच्या मतदारसंघातील एका पोलीस स्थानकाला पेटवून देण्याची धमकी दिली आहे. पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना मजूमदार यांनी स्थानिक पोलीस भाजप नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप केला. तर मजूमदार यांच्या विधानाप्रकरणी तृणमूलने त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार नेंदविली आहे. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांनी अटक करणे थांबवावे. पोलिसांनी स्वतःची भूमिका न बदलल्यास आम्ही पोलीस स्थानक पेटवून देऊ. असे मजूमदार यांनी एका सभेदरम्यान म्हटले होते. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याला मारहाण केली, परंतु पोलिसांनी कुणालाच अटक केली नाही, पोलीस हे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना अवैध कारवाया करण्याची मोकळीक देत असल्याचा आरोप मजूमदार यांनी केला आहे.