महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतिर्थावर गुढी पाडव्याच्या नववर्षाच्या पार्श्वभमुमीवर सभा होणार आहे. या सभेकडे सामान्य नागरिकांसह विविध पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या पाडवा मेळाव्याला राज्यभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते हजर राहणार असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनसे अध्यक्ष्य राज ठाकरे यांचा पाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा धर्म आणि मराठी या दोन विषयावर वाहीलेला टिजर पक्षाने नुकताच प्रदर्शित केला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे राज्यासह राष्ट्रिय पातळीवरिल अनेक मुद्द्यांना हात हालून त्यावर भाष्य करत असतात. गेल्या वर्षभरापासून राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. महाविकास आघाडी सरकार नंतर शिंदे- फडणवीस सरकार येऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर घेतलेल्या विविध निर्णयावर राज ठाकरे काय भाष्य करणार याची ही उत्सुकता लागली आहे. त्याच बरोबर ठाकरे गट, बाळासाहेबांचे विचार, मशिदिवरिल लाऊड स्पिकरचा मुद्दा, तसेच येणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा राज ठाकरे आपलं मत मांडण्याची शक्यता आहे.