वाढीसोबत 17.76 लाख टनच्या घरात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचे कच्च्या पोलादाचे उत्पादन ऑक्टोबर 2022 मध्ये वार्षिक आधारावर 25 टक्क्यांनी वाढून 17.76 लाख टन झाले आहे, अशी माहिती कंपनीने शुक्रवारी दिली आहे.
कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 14.25 लाख टन कच्च्या स्टीलचे उत्पादन केले होते. कंपनीच्या फ्लॅट रोल्ड (स्टील किंवा शीट इ.) उत्पादनांचे उत्पादन गेल्या महिन्यात 30 टक्क्यांनी वाढून 13.61 लाख टन झाले आहे. वर्षभरापूर्वी ते 10.45 लाख टन झाल्याची माहिती आहे. त्याचवेळी, लाँग रोल्ड उत्पादनांचे उत्पादन 11 टक्क्यांनी वाढून 3.70 लाख टन झाले आहे. याशिवाय, कंपनीच्या क्षमतेचा वापर ऑक्टोबरमध्ये 93 टक्के झाला आहे.