चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीची 15 वर्षे पूर्ण
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोनने चित्रपटसृष्टीतील स्वतःची 15 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त तिने दीपिकाने सेल्फ केअर व्यवसायक्षेत्रातील स्वतःचा ब्रँड लाँच केला आहे. या ब्रँडचे नाव तिने 82 ईस्ट ठेवले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने यासंबंधी माहिती दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी आम्ही एक आधुनिका सेल्फ केअर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. हा ब्रँड मूळचा भारताचा परंतु पूर्ण जगात फैलावलेला असावा अशी आमची इच्छा होती. या ब्रँडला 82 ईस्ट नाव दिले आहे. आमचा ब्रँड स्टँडर्ड मॅरिडियनपासून प्रेरित आहे. या ब्रँडला सादर करण्याचा उद्देश सेल्फ केअरला प्रत्येकासाठी सहज उपलब्ध करणे आहे. व्यवसाय सुरू करण्याचा प्रवास आतापर्यंत माझ्यासाठी अत्यंत रोमहर्षक राहिल्याचे तिने म्हटले आहे.
दीपिकाचा हा पहिलाच व्यवसाय नाही, यापूर्वी तिने स्वतःची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती, या कंपनीला तिने केए प्रॉडक्शन्स नाव दिले आहे. परंतु अद्याप या बॅनर अंतर्गत केवळ ‘छपाक’ याच चित्रपटाची निर्मिती झाली आहे.
नव्या ब्रँडकरता दीपिकाचा तिचा पती रणवीर सिंहने उत्साह वाढविला आहे. तू जे निर्माण केले आहेस, त्याबद्दल मला गर्व आहे, नेहमी चमकत रहा असे रणवीरने दीपिकाच्या पोस्टवर कॉमेंट करत म्हटले आहे. दीपिकासह अन्य अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही सेल्फ केअर व्यवसायात उडी घेतली आहे. कॅटरिना कैफ आणि सनी लियोनीचा देखील सेल्फ केअर ब्रँड आहे.