रेझर लवकरच होणार लाँच
नवी दिल्ली :
स्मार्टफोन निर्माती कंपनी मोटोरोला लवकरच भारतात मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा फोन सादर करणार आहे. सदरचा हा फोन जगातील सर्वात कमी जाडीचा फ्लिप फोन राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मोटोरोलाने आपल्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंटवर स्मार्टफोन संदर्भात टीझर सादर केला आहे.
टीझरमध्ये कंपनीने 22 जून रोजी फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स उघड करणार असल्याचे सांगितले आहे. तथापि, मीडिया रिपोर्ट्समध्ये स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांची माहिती उघड करण्यात आली आहे.
मोटोरोला रेझर 40 अल्ट्राच्या वैशिष्ट्यांबद्दल
डिस्प्ले: कंपनी मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा मध्ये 165 एचझेड रिफ्रेश रेटसह 6.69-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले मिळणार आहे.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर: उत्तम कामगिरीसाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरही आधुनिकतेने सुसज दिले आहे. मोटोरोला रेझर 40 अल्ट्रा मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसर मिळू शकणार असल्याचे म्हटले जात आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 12एमपी प्राथमिक कॅमेरा आणि 13एमपी अल्ट्रा वाइड लेन्सचा समावेश आहे. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी पंच होल डिझाइनसह 32एमपी कॅमेरा मिळू शकतो.
बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी, वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 3,800 एमएएच क्षमतेची बॅटरी यात येणार आहे, असे कळते.
कनेक्टिव्हिटी पर्याय: कनेक्टिव्हिटीसाठी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटसह चार्ज करण्यासाठी फोनला 5जी, 4जी, 3जी, वायफाय6, ब्लूटूथ टाइप सी मिळेल.