बेसुमार जिलेटीन स्फोटकांसह ,3 जेसीबी, 1 टिप्पर ट्रक जप्त ; दक्षिण गोवा जिल्हाधिकारी भरारी पथकातर्फे कारवाई,घटनास्थळी बॉम्बशोधक व श्वानपथक दाखल
फोंडा : वाडी तळावली येथे जिलेटीन स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीररित्या डेंगर कापणीप्रकरणी बेसुमार जिलेटीन कांड्याचा साठयासह 3 जेसीबी मशिन व 1 टिप्पर जप्त करण्यात आला आहे. काल रविवारी दुपारच्या सुमारास दक्षिण गोवा जिल्हाधिकारीच्या भरारी पथकातर्फे ही कारवाई करण्यात आली. वाडी तळावली येथे बेकायदेशररित्या डेंगरकापणीचे प्रकार मागील महिन्याभरापासून सुरू असल्याची माहिती काही ग्रामस्थांना मिळाली होती. दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी पहाटेच्या सुमारास होणाऱ्या जिलेटीन कांड्याच्या स्फोटामुळेच येथील सुर्यनारायण देवस्थानच्या भिंतीला तडा गेल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. यासंबंधी रेव्होल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यानी रितसर तक्रार दाखल केल्dयानंतर भरारी पथकाने ही कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाने फोंडा पोलिसाच्या मदतीने घटनास्थळी पंचनामा केला असता प्राथमिक तपासात फक्त 26 जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या, 3 जेसीबी मशिन, एक टिप्पर ट्रक व लोखंडी सळ्या जप्त करण्यात आल्या.
मात्र त्यानंतर डोंगरकापणीसाठी साठवून ठेवण्यात आलेल्या बेसुमार जिलेटीन स्फोटक कांड्याचा साठा उशिरा रात्री जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिलेटीनचा बेसुमार साठा बघितल्यानंतर लगेच बॉम्ब शोधक व श्वान पथकाला घटनास्थळी पंचनामा करण्यात आले. त्यानंतर सुरक्षितरित्या सर्व जिलेटीन स्फोटके निकामी करण्यात आलेली आहे. घटनेची सविस्तर माहिती देण्यास फोंड्याचे उपअधिक्षक आशिष शिरोडकर व निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी टाळलेली आहे. फोंडा पोलीस स्थानकांच्या हद्दित बसुमार जिलेटीन स्फोटके आढळतात, दर आठवड्याला जिलेटीन स्फोटाद्वारे डेंगर कापणी प्रकार सुरू असताना फोंडा पोलीस निद्रित अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले असून याप्रकरणी गुंतलेल्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.