सावंतवाडी / प्रतिनिधी
Mrs. Yojana Kesarkar of Degve Bazarwadi passed away!
डेगवे बाजारवाडी येथील सौ योजना गुंडू केसरकर वय 75 यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे ,चार सुना, नातवंडे असा परिवार आहे. डेगवे येथील किराणा व्यवसायीक, तरुण भारत वृत्तपत्र विक्रेते गुंडू केसरकर यांच्या पत्नी ,तर एस.टी महामंडळाचे कर्मचारी विकास, स्वयंभू काजू फॅक्टरीचे मालक विवेक, सहा आसनी रीक्षाचालक विलास आणि हॉटेल व्यवसायिक विनायक यांच्या त्या आई होत. योजना केसरकर यांच्या पार्थिवावर डेगवे येथील स्मशानभूमीत रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.