मुख्यालय पत्रकार संघाने केले स्वागत!
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून मुकुंद चिलवंत यांनी बुधवारी या पदाचा कार्यभार स्विकारला . मूळ परभणी येथील व औरंगाबाद येथून बदली झाल्याने ते या पदावर रुजू झाले. मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे पत्रकार कक्षात स्वागत करण्यात आले व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दोनच दिवसापूर्वी येथील जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी या पदाचा कार्यभार सोडत बदली झालेल्या रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.
मुकुंद चिलवंत यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालय येथे माहिती व जनसंपर्क विभागात आठ वर्षे काम केले होते. त्यानंतर त्यांची औरंगाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून सन 2018 मध्ये नियुक्ती झाली होती. तत्पूर्वी त्यांनी ई टीव्ही या न्यूज चॅनेल साठी औरंगाबाद विभागातील सहा जिल्ह्यात काम केले होते.
श्री चिलवंत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, संजय वालावलकर, नंदकुमार आयरे, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, गिरीश परब, विनोद परब, सतीश हरमलकर, बाळ खडपकर मुख्यालय पत्रकाराने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्हाभरातील अनेक पत्रकारांनी त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी संदीप राठोड, रवींद्र देवरे,अमित राणे, नरेंद्र खोबरेकर, महेंद्र भालेकर या कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले.