हृदयरोग विभाग कार्यान्वित होऊन ऑगस्टमध्ये वर्ष पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
अरिहंत हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या कुशल नेतृत्वाखाली हृदयरोग विभाग कार्यान्वित होऊन ऑगस्टमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. आता अरिहंत हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी, बॅरिएट्रिक, न्युरोलॉजी, युरोलॉजी, जनरल मेडिसिन हे सर्व विभाग सुरू झाले आहेत. या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अरिहंतचे संचालक उत्तम पाटील यांनी केले. याप्रसंगी अरिहंत उद्योग समूहाचे प्रणेते रावसाहेब पाटील, संचालक अभिनंदन पाटील व सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित उपस्थित होते.
शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, रुग्णांना येथे एकाच छताखाली उपचार मिळणार आहेत. निपाणी, अथणी, कागवाड येथील रुग्णांना त्वरित उपचारासाठी कार्डियाक विभाग सुरू करत आहोत. तालुका स्तरावर सामान्य लोकांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत.
डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, 16 ऑगस्ट 2022 रोजी अरिहंत हॉस्पिटलची सुरुवात झाली. या कालावधीत सहाशे ओपन हार्ट सर्जरी आणि दोन हजार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येबरोबरच आजारांचे प्रमाणही वाढत आहे, हे लक्षात घेऊन अरिहंतमध्ये अन्य विकारांवरील तज्ञ सेवा देणार आहेत.
या ठिकाणी ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिषेक मुंगरवाडी, पोटविकार तज्ञ डॉ. सुजित रे•ाr, बॅरिएट्रिक सर्जन डॉ. आयुष्का व डॉ. सुरेंद्र उगाळे, न्युरॉलॉजिस्ट डॉ. सूरज पाटील, युरॉलॉजिस्ट अमित मुंगरवाडी, जनरल मेडिसिनसाठी डॉ. युवराजकुमार यड्रावी, पॅथॉलॉजिस्ट डॉ. आराधना छत्रे व डॉ. अमृता जोशी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी दहा दिवसात अरिहंतची ब्लड बँक सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. सूत्रसंचालन आफरीन यांनी केले.