भोगावती/प्रतिनिधी
कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील आरती सामंत या महिलेचा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी झाल्याचे उघडकीस आले आहे. कारण याप्रकरणी नामदेव शामराव पोवार व रा.जोगेवाडी ता. राधानगरी या संशयित आरोपीस राशिवडे बुद्रुक येथील बिरदेव मंदीराजवळ करवीर पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिसांना चौकशी केल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबातून खुनाचा प्रकार समोर आलाय.
हे ही वाचा : पाडळी खुर्द येथे डोक्यात दगड घालून महिलेचा खून
कोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील आरती अनंत सामंत हिचा गुरुवारी रात्री डोक्यात वीट घालून खून झाल्याचा प्रकार पाडळी उघडकीस आला आहे. आरती हीच मृतदेह पडली खुर्द ता. करवीर येथे शेतवडीत शुक्रवारी सकाळी आढळून आला. याप्रकरणी करवीर पोलिसांचा तपास गतीमान झाला होता. हा खून गुप्तधनाच्या लालसेपोटी झाल्याची चर्चा होती. संशयित आरोपी नामदेव पोवार याच्याकडे मयत महिला आरती हिने गुप्तधन काढून दे म्हणून तगादा लावला होता. तर.पोवार याला पैशाची गरज होती. तसेच आरती इतर व्यक्तींशी बोलत असल्याचे आवडत नसल्यामुळेच त्याने खून केल्याचे पोलिसांना सांगितले.