युरोपमधील चेक प्रजासत्ताक या देशात एक असा खड्डा आहे, ज्यात कुणी पडले तर तो वृद्ध होऊनच बाहेर पडतो असे बोलले जाते. हा रहस्यमय खड्डा चेक प्रजासत्ताकमधील हाउसका कॅसलमध्ये आहे. प्रत्यक्षात 13 व्या शतकाच्या आसपास या महालाची निर्मिती याच खड्डय़ावर करण्यात आली होती. लोक या खड्डय़ाला ‘नरका’चे द्वार मानतात. या रहस्यमय खड्डय़ाची खोली अद्याप मोजता आलेली नाही.
या महालाच्या निर्मितीपूर्वी येथे सर्व कैद्यांना आणून खड्डय़ात लोटले जात होते अशी प्रचलित कहाणी आहे. यातील काही कैद्यांचा मृत्यू व्हायचा, तर जे कैदी खड्डय़ातून जिवंत बाहेर यायचे, त्यांची सुटका केली जात होती. एका कैद्यासोबत असेच घडले हेत.
या खड्डय़ातून जिवंत बाहेर पडल्यास मुक्तता केली जाईल असे या कैद्याला सांगण्यात आले होते. यानंतर या कैद्याला खड्डय़ात ढकलण्यात आले होते. यानंतर त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर लोकांना तो मृत्युमुखी पडल्याचे, परंतु तो मारला गेला नव्हता आणि काही काळानंतर तो या खड्डय़ातून सुखरुप बाहेर पडला होता.
खड्डय़ातून बाहेर काढण्यात आल्यावर कैद्याची स्थिती पाहून लोकांना धक्का बसला होता. हा कैदी अत्यंत वृद्ध दिसून येत होता. या घटनेमागील कारण अद्याप लोकांना समजलेले नाही. कालौघात अशाप्रकारच्या घटना आणि कहाण्यांची संख्या वाढू लागल्यावर लोकांनी हा खड्डा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला हाता. यानंतरच या खड्डय़ावरच महालाची निर्मिती करण्यात आली होती. परंतु हा खड्डा आजही दुसऱया जीवसृष्टीचे द्वार असल्याचे बोलले जाते.