यावर्षी सौम्य हायब्रीड इंजिनसह उपलब्ध होणार गाडी
नवी दिल्ली
झेक प्रजासत्ताकची कार निर्माती कंपनी स्कोडा ऑटोनेही आपल्या भविष्यातील योजना सादर केल्या आहेत. यामध्ये कंपनी वर्ष 2026 पर्यंत 6 नवीन इलेक्ट्रिक कार्स भारतीय बाजारपेठेत दाखल करणार आहे. यासाठीची सविस्तर योजना कंपनी आखत असल्याची माहिती आहे.
यामध्ये कंपनी वर्षाच्या अखेरीस आपल्या लाइनअपमध्ये सुपर्ब आणि कोडियाकचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे तर स्कोडाने त्यांच्या ‘लेट्स एक्सप्लोअर’ कार्यक्रमात दोन्ही कारची चित्रे प्रसिद्ध केली आहेत. टीझरमध्ये स्कोडाच्या दोन्ही फ्लॅगशिप मॉडेल्ससाठी केलेले काही अपडेट्स दिसून आले आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये स्लीक एलईडी हेडलाइट्स आणि स्लीक एक्सटीरियर एलईडी टेललॅम्प्स आहेत. दोन्ही कारमध्ये पॉवरट्रेन पर्यायही कंपनी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे.
सुपर्ब, कोडियाकचे मॉडेल याचवर्षी
स्कोडा दोन्ही कारच्या पेट्रोल, डिझेल, सौम्य आणि प्लग-इन हायब्रीड आवृत्त्या देखील ऑफर करणार आहे. सुपर्ब आणि कोडियाकची नवीन आवृत्ती 2023 च्या अखेरीस भारतात लॉन्च केली जाऊ शकते. स्कोडाने माहिती दिली आहे की या दोन्ही कारचे इंटीरियर पुन्हा डिझाइन केले आहे. अधिक वैशिष्ट्यो आणि तंत्रज्ञानासह त्यांची केबिन अधिक आकर्षक असेल अशी अपेक्षा आहे. सुपर्बचे चौथ्या पिढीचे मॉडेल फॉक्सवॅगन ग्रुपच्या ब्रातिस्लाव्हा, स्लोव्हाकिया येथील प्लांटमध्ये तयार केले जाईल. त्याच वेळी, कोडियाकचे दुसऱ्या पिढीचे मॉडेल असेल, जे झेक प्रजासत्ताकमधील स्कोडा प्रकल्पात तयार करण्यात येणार आहे.
ईव्हीच्या किंमती सुमारे 22.5 लाख रुपये
स्कोडा ऑटोचे ग्लोबल सीईओ क्लॉस गेल्मर यांनी सांगितले की, 2025 पर्यंत 25,000 युरो (अंदाजे 22.5 लाख रु) किंमतीसह जागतिक बाजारपेठेच्या परवडणाऱ्या विभागात प्रवेश करण्याची ब्रँडची योजना राहणार असल्याची माहिती आहे.
6 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार
कंपनीने 4 नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना देखील जाहीर केली आहे, ज्या 2026 पर्यंत येतील. तर इतर दोन एनयाक आणि एनयाक कूपचे अद्ययावत मॉडेल असतील. कॉम्पॅक्ट: 2024 मध्ये येणारी, ही कार करोकची जागा घेईल. त्याचे नाव एलरॉक आहे.
लहान: 2025 मध्ये येणारी, ही कार एमक्यूबी एओ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. तिची लांबी 4.2 मीटर असेल, तर ही स्कोडाची एंट्री-लेव्हल ईव्ही कार असेल.