128 वर्षे जुन्या रहस्याची होणार उकल
एनओएइ, मिशिगन प्रांत आणि ओशन एक्सप्लोरेशन ट्रस्टच्या संशोधकांनी हूरोन सरोवराच्या तळाशी शेकडो फूट खाली एका जहाजाचा शोध लावला आहे. हे जहाज अमेरिकेच्या मिशिगनमधील ह्युरॉन सरोवरात सापडले आहे. या सरोवराला कधीकाळी जहाजांचा काळ म्हटले जात होते. एनओएएच्या थंडर बे राष्ट्रीय सागरी उद्यानातील हे जहाज म्हणजे कधीकाळी बुडालेले आयरनटन असल्याचे सांगण्यात आले.
ह्युरॉन सरोवरात एक धोकादायक हिस्सा असून तेथे अनेक जहाजांनी जलसमाधी घेतलेली आहे. या सरोवराच्या याच हिस्स्यात आल्यावर ‘आयरनटन’ देखील स्वत:ला वाचवू शकले नव्हते. थंडर बे नॅशनल मरीन सँक्चुअरीच्या वेबसाइटवर प्रकाशित एका अहवालात 191 फूट लांबीच्या मालवाहू जहाजाबद्दल माहिती देण्यात आली आहे. हे जहाज सप्टेंबर 1894 मध्ये एका वादळादरम्यान अन्य जहाजाला धडकले होते. यानंतर ही दोन्ही जहाजं बुडाली होती.
या दुर्घटनेत आयरनटनचा कप्टन आणि 6 खलाशी एका लाइफबोटमध्ये दाखल झाले होते, परंतु जहाजापासून वेगळे होण्यापूर्वीच ते सरोवरात खेचले गेले, यातील केवळ दोन खलाशी वाचले होते. इतिहासकार, पुरातत्वतज्ञ आणि तंत्रज्ञांच्या एका पथकाने 2019 मध्ये या जहाजाच्या अवशेषांचा शोध लावला होता. या अवशेषांना स्पॅन करण्यासाठी दूरवरून नियंत्रित होणाऱ्या पॅमेऱ्यांना तैनात करण्यात आले होते असे अधीक्षक जेफ ग्रे यांनी सांगितले आहे. समकालीन अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींनी आयरनटन बुडण्याच्या जागेचे वर्णन केलेले असले तरीही अचूक स्थानाबद्दल 120 हून अधिक वर्षांसाठी रहस्य कायम होते. एनओएएच्या थंडर बे नॅशनल मरीन सँक्चुअरी, मिशिगन प्रांत आणि ओशन एक्स्प्लोरेशन ट्रस्टच्या संशोधकांनी बुडालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक सागरी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर केला.
आयरनटन सरोवराच्या तळाशी शेकडो फूट खाली संरक्षित स्वऊपात असल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान तेथे कुठलेच मानवी अवशेष दिसून आलेले नाही. परंतु लाइफबोट मोठ्या जहाजाशी बांधलेल्या स्थितीत दिसून आली. या संशोधनात अनेक संघटना सामील होत्या असे ग्रे यांनी सांगितले आहे. सरोवरात सुमारे 200 जहाजं बुडाल्याचे मानले जाते. या सरोवराचा आकार प्रचंड मोठा आहे. अनेक घटकांमुळे हे सरोवर दोन शतकांहून अधिक काळापर्यंत जहाजांसाठी धोकादायक ठरले होते, परंतु आधुनिक दिशादर्शन यंत्रण आणि हवामानाच्या अनुमानामुळे हा धोका कमी झाला असल्याचे सागरविषयक तज्ञ स्टेफनी गंडुल्ला यांनी म्हटले आहे.