देशभरातील 250 प्रतिनिधींचा सहभाग
प्रतिनिधी / पणजी
भारतीय मानव वर्तन सोसायटीतर्फे (आयएसपीएन) आयोजित वार्षिक राष्ट्रीय नर्सिंग परिषदेस आज शुक्रवार दि. 24 पासून गोव्यात प्रारंभ होत आहे. यासंबंधी गुऊवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. रेड्डेम्मा यांनी ही माहिती दिली. गोवा आरोग्य खाते आणि नर्सिंग प्रशिक्षण संस्था बांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन आज सायंकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते होणार आहे.
बांबोळी येथील नर्सिंग प्रशिक्षण संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात तीन दिवस ही परिषद चालणार असून त्यावेळी आयएसपीएनचे आश्रयदाते डॉ. टी. दिलीपकुमार, गोवा नर्सिंग प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विल्सन फर्नांडीस, आयएसपीएनचे संयुक्त सचिव़ डॉ. जी. बालमुऊगन, सरचिटणीस डॉ. जी राधाकृष्णन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देशभरातील 250 प्रतिनिधी येणार यंदाची ही 22 वी परिषद असून यापूर्वी देशाच्या विविध राज्यांत अशा परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा तो मान गोव्याला मिळाला आहे. यंदाच्या परिषदेची संकल्पना ‘रोल ऑफ नर्सिस इन प्रोमोटिंग मेंटल हेल्थ-लाईफ स्पॅन एप्रोच’ अशी असून काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सुमारे 250 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.