ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयडी स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. शहीदांमध्ये 10 डीआरजी जवान आणि एका चालकाचा समावेश आहे. स्फोटानंतर परिसर सील करण्यात आला आहे.
डीआरजी दल माओवादी कॅडरच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीवरून दंतेवाडा येथून नक्षलविरोधी मोहिमेसाठी रवाना झालं होतं. ऑपरेशन फत्ते केल्यानंतर परत येत असताना अरणपूर रस्त्यावर माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट करुन लष्कराचं पिकअप उडवलं. यात 10 डीआरजी जवान आणि एक चालक शहीद झाला. काही जवान जखमी झाल्याची माहिती आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. या प्रकारानंतर घटनास्थळी सीआरपीएफचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.