प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर – पन्हाळा महामार्गावरील केर्ली येथील जगबुडी पुलाजवळ शुक्रवारी पहाटे रस्त्यावर पुराच्या पाण्याची पातळी पडली आहे. थोडक्यात या ठिकाणी पुराचे पाणी आणि रस्त्याची लेव्हल समांतर झाल्यामुळे पाणी आणखी थोडे वाढले तर या ठिकाणची सध्या चालू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या व्यतिरिक्त या रस्त्यावर कोठेही पाणी नाही.
गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी पुराचे पाणी रस्त्याच्या खाली दोन फुटावर खाली होते मात्र पावसाची संततधार आणि राधानगरी धरणातील पाणी यामुळे आज शुक्रवारी पहाटे पुराच्या पाण्याची पातळी रस्त्याच्या अगदीच बरोबरीने झाली आहे. त्यामुळे थोडे जरी पाणी वाढले तरी या ठिकाणची सध्या चालू असलेली वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक चालू आहे मात्र कोणत्याही क्षणी प्रशासन वाहतूक बंद करू शकते. या ठिकाणच्या व्यतिरिक्त शिवाजी पूल ते कोतोली फाटा दरम्यान कोणत्याही ठिकाणी पुराचे पाणी आलेले नाही.