|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » फलंदाजाच्या बॅटने घेतला यष्टिरक्षकाच्या जबडय़ाचा वेध

फलंदाजाच्या बॅटने घेतला यष्टिरक्षकाच्या जबडय़ाचा वेध 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियातील ऍडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात फलंदाजांच्या हातामधील बॅट फटका मारताना निसटली आणि ती यष्टीमागे असलेल्या यष्टीरक्षकाच्या जबडय़ावर आदळली या घटनेमध्ये यष्टीरक्षकाच्या जबडय़ाचे हाड मोडले.

अलिकडच्या कालावधीत क्रिकेट मैदानावर क्रिकेटपटूंना अशा वारंवार दुखापती होत असल्याच्या घटना पाहावयास मिळतात. सोमवारी ऍडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबोर्न रेनेगेड यांच्यात बिग बॅश टी-20 साखळी स्पर्धेतील सामना खेळविला गेला. या सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सचा फलंदाज बॅड हॉज ऑन साईडच्या दिशेने फटका मारताना त्याच्या हातातील बॅट निसटली आणि ती मेलबोर्न रेनेगेडचा यष्टीरक्षक पीटर नेव्हिलच्या जबडय़ावर आदळली. नेव्हिलच्या जबडय़ाचे हाड मोडले आहे.

ब्रॅड हॉज आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आक्रमक फटकेबाजी करत होता. शेवटच्या तीन षटकात हॉजच्या संघाला विजयासाठी 43 धावांची जरूरी होती. मेलबोर्न रेनेगेडने ऍडलेड स्ट्रायकर्सला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले होते. 18 व्या षटकातील लंकेच्या टी. परेराच्या पहिल्याच चेंडूवर हॉजने ऑनसाईडच्या दिशेने जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा फटका चुकला आणि त्याच्या हातातील बॅट वेगात यष्टीरक्षक नेव्हिलच्या जबडय़ावर आदळली. चेंडू मिळविण्यासाठी नेव्हिल पुढे येत असतानाच त्याला आपल्या चेहऱयावर बॅट आदळल्याची कल्पनाही आली नाही. या घटनेनंतर तो जमिनीवर कोसळला. त्याच्या जबडय़ाला सुज आली असून त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्याच्या जबडय़ाचे हाड मोडल्याचे आढळून आले. हॉज याच षटकात 26 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऍडलेड स्ट्रायकर्सला हा सामना 6 धावांनी गमवावा लागला.