|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » भाजपला गुंडांचं ‘याड’ लागलं : निलम गोऱहे

भाजपला गुंडांचं ‘याड’ लागलं : निलम गोऱहे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यामधील आरोप प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नसून आता शिवसेनेच्या आमदार निलम गोऱहे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाला लागलेले वेड हे ‘सैराट’ चित्रपटातील आर्ची -परशा सारखेच आहे, अशी टीका आमदार नीलम गोऱहे यांनी भाजपवर केली आहे.

त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार आणि किरीट सोमय्या यांच्यावरही हल्लाबोल केला. या दोघा नेत्यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग ऊपर’ अशी झाली आहे. पारदर्शकताबाबत केंद्राने दिलेल्या अहवालावरून ते दिसून येत आहे, असा टोला लगावून त्यांनी शेलार आणि सोमय्या यांची तोंडे जनताच बंद करतील, असेही त्या म्हणाल्या.

Related posts: