|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत 4-0 फरकाने जिंकेल : गांगुली

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत 4-0 फरकाने जिंकेल : गांगुली 

वृत्तसंस्था/ मुंबई

आगामी कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 4-0 असा एकतर्फी सफाया केला तर त्यात मला आश्चर्य वाटणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीने शनिवारी केले. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांची ही मालिका दि. 23 फेब्रुवारीपासून पुणे येथे होणाऱया पहिल्या लढतीने सुरु होत आहे. मागील 25 वर्षांच्या कालावधीत भारताने मायदेशात विविध कसोटी मालिकांमध्ये वर्चस्व गाजवले, त्याचे श्रेय फिरकीपटूंना प्राधान्याने द्यावे लागेल, असे तो म्हणाला. अलीकडील कालावधीत अनिल कुंबळे, हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी ही परंपरा यशस्वीपणे चालवली आहे, असे तो म्हणाला. 2001 मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखालीच भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडी भरुन काढत 2-1 असा देदीप्यमान विजय संपादन केला होता, ते इथे विशेष लक्षवेधी ठरावे.