|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आयकरच्या छाप्यात कोटय़ावधीची बेनामी मालमत्ता उजेडात

आयकरच्या छाप्यात कोटय़ावधीची बेनामी मालमत्ता उजेडात 

वार्ताहर   / सोलापूर 

     नोटाबंदीनंतर बँकांमधे प्रमाणापेक्षा अधिक उलाढाली करणाऱया व्यापाऱयांवर आयकर विभागाने करडी नजर ठेवली आहे. त्यानुषांने शहरातील काही होलसेल वाईन विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईत कोटय़ावधी रूपयाचे घबाड समोर आले असल्याची चर्चा शहरात सध्या सुरु आहे.

    नोटाबंदीच्या काळात प्रमाणापेक्षा अधिक आर्थिक उलाढाल करणाऱया व्यापाऱयांच्यावर गेल्या काही दिवसापासून आयकर विभागाने लक्ष केंद्रीत केले होते. चारच दिवसापासून होलसेल वाईन विक्री करणाऱया आशा व्यापाऱयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्याची चर्चा आहे. सोलापूर शहरासह जिल्हय़ातील अन्य तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या काही व्यापाऱयांचाही यामध्ये समावेश आहे. या कारवाईत व्यापाऱयांच्याकडे बेनामी कोटय़ावधी रूपये आढळून आले आहेत. आयकर विभागाने या छाप्याची गुप्तता पाळली असली तरी या कारवाईत कोटय़ावधी रूपयाची बेनामी मालमात्ता असून जिल्हय़ातील सर्वात मोठी कारवाई असल्याचेही बोलले जात आहे.

  या व्यापाऱयांच्याकडून मिळालेल्या बेनामी रक्कमेतून कोटय़ावधी रूपयाचा आयकर वसूल होणार आहे. तर वसूल करण्यात येणारी रक्कम ही कल्याणकारी योजनेत जमा करण्यात येणार आहे. नोटाबंदी दरम्यान आयकर खाते मोठी उलाढाल होणाऱया खाते धारक आणि व्यापाऱयंवर करडी नजर ठेवून आहे.

 आयकर विभागाच्या या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱयांच्यामधून खळबळ माजली आहे. अनेक व्यापाऱयांनी आपले व्यवहार तपासून घेण्यासही सुरूवात केली आहे.   आयकर विभागाने केलेल्या या कारवाईची गुप्तता पाळण्यात येत असली तरी पुढील दोन दिवसात हे स्पष्टपणे उजेडात येईल असेही सांगण्यात आले. आयकर  विभागाच्या पुढील कारवाईच्या लिस्टवर आता कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.  

Related posts: