|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » सर्वोच्च न्यायालयाने बजावले न्यायामूर्तींविरोधात वॉरंट

सर्वोच्च न्यायालयाने बजावले न्यायामूर्तींविरोधात वॉरंट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. करणन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर अशाप्रकारे वॉरंट जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करणन यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी सुनावणीदरम्यान बेंचसमोर न्या. करणन हजर झाले नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जगदिशसिंह खेहर यांच्या नेतृत्त्वाखालील बेंचने करनन यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आणि 31 मार्चला पुन्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Related posts: