|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धुळे येथील डॉक्टरांवरील हल्ल्याचा आजऱयात निषेध

धुळे येथील डॉक्टरांवरील हल्ल्याचा आजऱयात निषेध 

प्रतिनिधी/ आजरा

धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आजरा येथील इंडीयन मेडीकल असोशिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला. गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी करण्यात आली असून याबाबतचे निवेदन तहसीलदार शुभांगी फुले यांना देण्यात आले.

धुळे येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आजरा शहरातून मोर्चाने जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोरांना कडक शासन करण्याबरोबरच भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी योग्य ती काळजी प्रशासनाने घ्यावी तसेच मोठय़ा हॉस्पिटलमध्ये पुरेसे पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तसेच खाजगी डॉक्टर्स व पोलीस यांची एक कमिटी करून वरचेवर एकमेकांच्या संपर्कात रहावे व कुठल्या डॉक्टरांनी मदत मागितल्यास त्यांना पोलीस संरक्षण तातडीने देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

या निवेदनावर इंडीयन मेडीकल असोशिएशनचे आजरा तालुकाध्यक्ष डॉ. जयकुमार डांग, उपाध्यक्ष डॉ. दीपक सातोस्कर, सचिव डॉ. स्मिता फर्नांडिस, निमाच्या अध्यक्षा डॉ. अंजनी देशपांडे, होमीओपॅथीक असोशिएनशचे अध्यक्ष डॉ. दीपक हरमळकर यांच्यासह आजरा शहर आणि तालुक्यातील डॉक्टरांच्या सहय़ा आहेत. निवेदन देताना डॉ. महादेव सोमशेट्टी, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. बी. एफ. गॉडद, डॉ. अमित पुंडपळ, डॉ. योगेश नाईक, डॉ. संदीप देशपांडे यांच्यासह आजरा शहर तसेच तालुक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.