|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरा पोलिसांच्या जीपला अपघात

आचरा पोलिसांच्या जीपला अपघात 

आचरा आचरा पोलीस ठाण्याच्या जीपला आचरा-कणकवली मार्गावर कुडोपी फाटय़ानजीक चिरे वाहतूक करणाऱया डंपरने समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यात आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक महेंद्र शिंदे जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायाला मुका मार लागला. त्यांच्यावर आचरा आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. हा अपघात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास झाला.

  आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे व चालक रमेश झेमणे हे आपल्या त्याब्यातील आचरा पोलीस ठाण्याची सुमो जीपने (एमएच 07-जी-2137) ओरोस येथे कामानिमित्त निघाले होते. कुडोपी फाटानजीक उभ्या असणाऱया डंपरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून वाहतूक करणारा डंपर चालक अनंत परब यांचा डंपर (एम एच07 सी 5429) येत होता. त्याला सावकाश येण्याचा सिग्नल देवूनसुद्धा तो भरधाव वेगात येत पोलिसांच्या जीपला धडकला. डंपरच्या धडकेत पोलिसांची जीप डंपरसह दहा ते पंधरा फूट फरफटत गेली. यात पोलिसांच्या जीपचे दर्शनी भागाचे नुकसान झाले. जीपमधील महेंद्र श्ंिादे समोरच्या भागावर आदळल्याने त्यांच्या दोन्ही पायाला जबर मुका मार लागला.

Related posts: