|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » नदाल, निशीकोरी, रेओनिक विजयी

नदाल, निशीकोरी, रेओनिक विजयी 

वृत्तसंस्था/ मियामी

एटीपी टूरवरील पुरूषांच्या मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने इस्त्रायलच्या सेलाचा पराभव करून एकेरीची तिसरी फेरी गाठली. जपानचा निशीकोरी आणि कॅनडाचा रेओनिक यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले.

राफेल नदालने डुडी सेलाचा 80 मिनिटाच्या कालावधीत 6-3, 6-4 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. जपानच्या द्वितीय मानांकित निशीकोरीने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनवर 6-4, 6-3 अशी मात केली. निशीकोरीचा पुढील फेरीतील सामना स्पेनच्या व्हर्डेस्कोशी होईल. अन्य एका सामन्यात कॅनडाच्या रेओनिकने सर्बियाच्या ट्रोस्कीचा 6-3, 7-5 असा फडशा पाडत तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. अर्जेंटिनाच्या पेलाने बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हचे आव्हान संपुष्टात आणले. अमेरिकेच्या डोनाल्ड यंगने फ्रान्सच्या लुकास पौलीचा 6-2, 6-4 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सच्या बेनोई पेरीने क्युव्हेसचा पराभव करत तिसरी फेरी गाठली.

Related posts: