|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आफ्रिकन देश भारतावर नाराज

आफ्रिकन देश भारतावर नाराज 

नवी दिल्ली

ग्रेटर नोएडात आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर आफ्रिकेच्या देशांनी भारत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारत सरकारवर हल्ल्याच्या घटनांची निंदा न करण्याचा आरोप केला. भारत आणि आफ्रिकेच्या संबंधांकरता ही नाराजी दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते. आफ्रिकेच्या विद्यार्थ्यांवर हल्ल्यांविरोधात भारतातील आफ्रिकन देशांच्या दूतावासाच्या प्रमुखांनी विशेष बैठक घेतली. यादरम्यान त्यांनी हल्ल्याच्या घटनेवर देखील विचार केला. भारत सरकारने हल्ले रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलली नाहीत असे त्यांचे मत बनले.

ग्रेटर नोएडातील घटनेची आफ्रिकन देश निंदा करतात असे वक्तव्य जारी करण्यात आले. भारत सरकारकडून या हल्ल्याची निंदा केली जावी, अशी मागणी या देशांकडून करण्यात आली.