|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » घरखरेदीसाठी पीएफची 90 टक्के रक्कम

घरखरेदीसाठी पीएफची 90 टक्के रक्कम 

कर्जाचे हप्ते फेडण्याचाही पर्याय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 संघटीत क्षेत्रात काम करणाऱया कर्मचाऱयांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे. आता कर्मचारी घरखरेदी किंवा बांधणीसाठी आपल्या पीएफमधून 90 टक्क्यापंर्यंत रक्कम काढू शकतील. याशिवाय ते आपल्या मासिक योगदानातून गृहकर्जाचा ईएमआय देखील भरू शकतात. यासाठी केंद्र सरकारने ईपीएफ कायदा 1952 मध्ये दुरुस्ती केली आहे.

ईपीएफओ (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना) च्या सदस्यांसाठी गृह योजनेशी संबंधित ही तरतूद 12 एप्रिलपासून लागू झाली आहे. यामुळे ईपीएफओच्या जवळपास 4 कोटी सदस्यांना लाभ होईल. केंद्र सरकारने 12 एप्रिल रोजी याविषयी अधिसूचना जारी केली आहे.

गृहकर्जाची भरणा

योजनेंतर्गत सदस्य आपल्या पीएफ खात्यातून गृहकर्जाचा मासिक हप्ता भरू शकणार आहे. त्याचबरोबर जर कोणत्याही सदस्याची ईपीएफओसोबतचे सदस्यत्व संपुष्टात आले आणि त्याच्या पीएफ खात्यात मासिक हप्ता भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर सरकार हा हप्ता भरण्यासाठी जबाबदार नसेल.

2.20 लाखाचे अनुदान

जर सदस्याचे वार्षिक उत्पन्न पंतप्रधान निवास योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर तो या योजनेंतर्गत मिळणाऱया 2.20 लाख  रुपयांच्या अनुदानाचा लाभ घेऊ शकणार आहे.

सोसायटीचा सदस्य बनण्याची अट

ईपीएफओ सदस्याला गृह योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 सदस्यीय सहकारी किंवा गृहविषयक बनविण्यात आलेल्या सोसायटीचा सदस्य बनावे लागेल.

ईपीएफओ सदस्य या योजनेंतर्गत पीएफमधून तेव्हाच रक्कम काढू शकतील, जेव्हा ती कमीतकमी 3 वर्षे यात योगदान देत असतील.

सदस्य या योजनेचा लाभ एकदाच घेऊ शकतील. जर कोणाच्या पीएफमध्ये 20 हजारपेक्षा कमी रक्कम असेल तर तो योजनेंतर्गत पैसे काढू शकणार
नाही.

Related posts: