|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सातार्डा रवळनाथ पंचायतन कलशारोहण सोहळा उत्साहात

सातार्डा रवळनाथ पंचायतन कलशारोहण सोहळा उत्साहात 

सातार्डा : सातार्डा ग्रामदैवत श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा कलशारोहण सोहळा श्रीमत सरस्वती स्वामी यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात शनिवारी झाला. तर रविवारी रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या नूतन मंदिरात मूर्ती पुनःप्रतिष्ठापना होणार आहे.

ग्रामदैवत श्री रवळनाथ देवस्थानच्या कलाशारोहण सोहळय़ासाठी सकाळपासूनच भाविकांची रिघ लागली होती. सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात व फटक्यांच्या आतषबाजीत कलशारोहण सोहळा थाटात झाला. यावेळी यज्ञचुडामणी अरुण वझे गुरुजी, देवस्थानचे मानकरी, विरतिक, भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीमद् सरस्वती स्वामींचे भाविकांनी दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी कलाकार अक्षय नाईक, नेहा कळसुलकर यांचा ‘स्वरहिंदोळा’ कार्यक्रम झाला. तसेच ‘भानुदास करी विठ्ठल माहेरी’ या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

                        मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा आज

रवळनाथ पंचायतन देवस्थानचा नवीन मंदिर मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा रविवारी दाभोली येथील श्री मठ संस्थानचे प्रद्युम्नानंद सरस्वती स्वामी यांचे शिष्य श्रीमद दत्तानंद सरस्वती स्वामी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रम, महापूजा, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 6 वाजता सातोसे येथील देवी माऊली भजन मंडळाचे भजन, त्यानंतर वेंगुर्ले येथील भाऊ सातार्डेकर यांचे वारकरी भजन, रात्री 10 वाजता श्री देव रवळनाथ नाटय़मंडळाचा ‘जावळीचा राजेश्वर’ हा ऐतिहासिक नाटय़प्रयोग होणार आहे.

Related posts: