|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » जम्मू-काश्मीर पोलीस भरतीसाठी मोठा प्रतिसाद

जम्मू-काश्मीर पोलीस भरतीसाठी मोठा प्रतिसाद 

 श्रीनगर:

जम्मू-काश्मीर राज्याच्या पोलीस दलासाठी गुरुवारी झालेल्या भरती शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या भरतीसाठी जवळपास 3000 युवक तसेच युवतींनी सहभाग दर्शविल्याची माहिती राज्य पोलीस दलाच्या प्रवक्त्याने दिली.

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग आणि उत्तर काश्मीरच्या बांदिपोरा जिह्यांमध्ये हे भरती शिबिर पार पडले. याकरता हजारो युवक आणि युवतींनी भरती शिबिरात हजेरी लावली होती. भरतीच्या पहिल्या दिवशी अनंतनाग येथे 1674 तर बांदिपोरा येथे 1295 जण उपस्थित राहिले. बांदिपोरा येथे शुक्रवारपर्यंत तर अनंतनाग येथे रविवारपर्यंत भरती प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे प्रवक्त्याने सांगितले. बुधवारी काश्मीरात तेथीलच लष्करी अधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या झाली होती. या पार्श्वभूमीवर या भरतीला मिळालेला मोठा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. स्थानिकांना सुरक्षा दलांमध्ये दाखल होण्यास दहशतवादी प्रवृत्त करत असून वेळप्रसंगी जीवे मारण्याची धमकी देत आहेत. गुरुवारी शारीरिक चाचणीत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी बोलाविले जाईल असेही प्रवक्त्याने सांगितले.

Related posts: