|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सदरबझारमध्ये अनाधिकृत झोपडय़ा वाढू लागल्या

सदरबझारमध्ये अनाधिकृत झोपडय़ा वाढू लागल्या 

प्रतिनिधी /सातारा :

सदरबझार परिसरात लक्ष्मीटेकडी झोपडपट्टीच्या जागेवर घरकुल उभे रहात आहे. या घरकुलाचे काम मंदगतीने अनेक अडचणी पार करुन सुरु आहे. काही घरकुलांमध्ये लाभार्थ्यांनी रहाण्यास सुरुवातही केली. मात्र, काही नगरसेवकांच्या कृपेने कॅनॉललगतच झोपडय़ा वाढु लागल्या आहेत. या झोपडय़ा टाकण्यासाठी पैसेही घेतले जात आहेत. त्यामुळे शासनाची जागा गायब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारांमुळे नेत्यांच्या नावाला बटा लागण्याचा प्रकार सध्या सदरबझार परिसरात सुरु आहे.

सातारा शहरातील सर्वात शांत परिसर म्हणून सदरबझारची ओळख आहे. या परिसरात बहुतांशी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आर्वजून जागा घेवून घर बांधण्याचे स्वप्न बघतात. परंतु अलिकडच्या काही वर्षामध्ये या परिसराला झोपडपट्टीचे स्वरुप येवू लागले आहे. लक्ष्मीटेकडी, आणि भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी या दोन्ही झोपडपटय़ा तशा जुन्या असल्या तरीही या झोपडपट्टीतील सर्वांना घरकुलाचा लाभ सातारा पालिकेने आणलेले घरकुलामध्ये दिला गेला. काहींची चांगली परिस्थिती असतानाही त्यांनी मिळवला गेला. आता हे घरकुल कसेबसे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. असे असताना शासनाची नवीन योजना आली आहे. ती पंतप्रधान आवास योजना या योजनाचा लाभ कसा मिळेल या उद्दात हेतून या परिसरातील काही नगरसेवकांच्या कृपेने गेल्या पंधरा दिवसात कॅनॉलच्या रस्त्यावर झोपडय़ा वसवण्याचा प्रकार सुरु आहे. काही हजारांमध्ये झोपडय़ा टाकण्यास यांच्याकडून परवानगी मिळत असल्याची जोरदार या परिसरात चर्चा सुरु आहे. एका बाजूला राज्य शासनाकडून झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी विविध योजना येत आहेत. त्या योजनांना नेमका हरताळ सदरबझार परिसरात बसत आहे. त्यामुळे अशा होत असलेल्या अतिक्रमणावर पालिका नेमकी काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.