|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » विविधा » गणेशोत्सवासाठी 142 विशेष गाडय़ा

गणेशोत्सवासाठी 142 विशेष गाडय़ा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकण मार्गावर तब्बल 142 विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस , दादर, पुणे, करमळी, सावंतवाडी , रत्नागिरी या स्थानकांदरम्यान या ट्रेन चालवण्यात येतील.

ट्रेन क्रमांक 01445 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी 18 ऑगस्ट ते 20 सप्टेंबरदरम्यान एकमार्गी चालवण्यात येणार आहे. मुंबई रात्री 00.30 वाजता निघणार असून , दुपारी 14.30 वाजता करमळी येथे पोहचणार आहे. या विशेष गाडय़ांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

 

Related posts: