|Thursday, September 19, 2019
You are here: Home » उद्योग » कॉल गुणवत्तेसाठी ‘ट्राय’कडून ऍप

कॉल गुणवत्तेसाठी ‘ट्राय’कडून ऍप 

नवी दिल्ली

 कॉलची गुणवत्ता मोजण्यासाठी ट्रायकडून मोबाईल ऍप सादर करण्यात आले. ‘माय कॉल’ या ऍपमध्ये कॉलच्या गुणवत्तेला रेटिंग आणि दूरसंचार नियामक ट्रायला याची माहिती देता येईल. या ऍपवर कोणत्याही कॉलचा दर्जा नोंदविता येईल. या ऍपच्या माध्यमातून अनुभव शेअर करता येईल. यामध्ये व्हॉईस कॉल क्वॉलिटीसाठी दूरसंचार नियामकाला माहिती देण्यात येईल. ग्राहकांना आपल्या कॉलची माहिती एकत्र ठेवण्यास मदत होईल.

या ऍपवर कॉल संपल्यानंतर एक पॉप-अप येईल. ग्राहकांना आपल्या अनुभवाने रेटिंग देण्यासाठी सांगण्यात येईल. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. ग्राहक फोनवर इनडोअर, आऊटडोअर आणि प्रवास करताना बोलत होता याची माहिती देता येईल. सर्व दूरसंचार कंपन्यांच्या कॉल क्वॉलिटीवर लक्ष ठेवण्यात येईल.