|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » NEET Exam Result 2017 ; पंजाबचा नवदिपसिंह देशात तर पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात प्रथम

NEET Exam Result 2017 ; पंजाबचा नवदिपसिंह देशात तर पुण्याचा अभिषेक डोगरा राज्यात प्रथम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया ‘नीट’ परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)ने हा निकाल जाहीर केला. पंजाबचा नवदिपसिंहचा देशात प्रथम क्रमांक तर पुण्याच्या अभिषेक डोगरा या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा 2017 चा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये पंजाबचा नवदिपसिंह याने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, पुण्याच्या अभिषेक डोगरा या विद्यार्थ्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यंदाच्या वर्षी 12 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी 10 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये परीक्षा दिली. याशिवाय 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती.

Related posts: