|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अभिनेते राजकारणात आल्याने तामिळनाडूची हानी : स्वामी

अभिनेते राजकारणात आल्याने तामिळनाडूची हानी : स्वामी 

नवी दिल्ली

 भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणप्रवेशाच्या शक्यतेवर टीका केली आहे. चित्रपट अभिनेत्यांनी राजकारणात प्रवेश केल्याने तामिळनाडूची मोठी हानी झाल्याचे वक्तव्य स्वामी यांनी केले आहे. चित्रपट कलाकारांच्या राजकारणातील हस्तक्षेपामुळे तामिळनाडू मागे पडला आहे. त्यांचे संवाद देखील दुसऱया व्यक्तीकडून लिहिले जातात, अशा कलाकारांकडे काळे धन असते आणि त्यांची विदेशात बँक खाती असतात. याचमुळे तामिळनाडू भ्रष्ट राज्यांमध्ये सामील असल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे. स्वामी यांनी रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाच्या शक्यतेला चुकीचे पाऊल ठरविले आहे. रजनीकांत हे अशिक्षित असून राजकारणासाठी अपात्र असल्याचेही स्वामी यांनी म्हटले आहे. राजकारणातील जाणकारांशी आपली चर्चा सुरू असून सर्व काही ठरल्यानंतर आपण याची घोषणा करू असे रजनीकांत यांनी अलिकडेच सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी समर्थकांशी संवाद साधल्यानंतरच निर्णय घेईन असेही स्पष्ट केले आहे.

Related posts: