|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » leadingnews » ही पहिली दुर्घटना नाही ; गोरखपूर दुर्घटनेवर शहांचे बेजबाबदार वक्तव्य

ही पहिली दुर्घटना नाही ; गोरखपूर दुर्घटनेवर शहांचे बेजबाबदार वक्तव्य 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

इतक्या मोठय़ा देशात खूप साऱया दुर्घटना झाल्या आहेत. पहिल्यांदा अशी दुर्घटना झालेली नाही, असे बेजबाबदार वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज केले.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत शाह बोलत होते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर बालमृत्यूप्रकरणावर त्यांनी हे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, राजीनामा मागणे हे काँग्रेसचे काम आहे. देशात यापूर्वीही एवढय़ा मोठय़ा दुर्घटना झाल्या आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही. दरम्यान, शाह यांनी दहिहंडी उत्सवाबाबतही वक्तव्य केले. ते म्हणाले, हा सरकारी उत्सव नाही. जशी देशभरात साजरी होईल. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील लोक आपल्या इच्छेप्रमाणे ती साजरी करतील, असेही शाह म्हणाले.

Related posts: