|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » चार्जिंगला लावून फोन उचलल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू

चार्जिंगला लावून फोन उचलल्याने शॉक लागून तरूणाचा मृत्यू 

ऑनलाइन टीम / मुंबई :

मोबईल चार्जिंगला लावून फोन उचलल्याने मुंबईत तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 28 वर्षीय तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्य़ू झाला.

बुधवारी तपनचा मित्र त्याच्या घरी आला होता. त्यावेळी तपनने त्याचा फोन चर्जिंगला लावला होना. तितक्यात एक फोन आल्यामुळे त्यांन चार्जिंगला लावलेला असतानाच फोन उचलला. मात्र विजेचा जोरदार धक्का बसून तपन जागेवरच कोसळला. तपनला तातडीने जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला तपन वांद्र्यातील शास्त्राrनगर लेन नं.1मध्ये राहायचा.तो फुलांचे डिझाईन बनवण्याचे काम करत असे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. या प्रकारामुळे तपनच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी तपनचा मोबाईल घेतला आहे.

 

Related posts: